Pune Crime : युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, अन् चांगले पैसे मिळवा म्हणत पुण्यातील महिलेला घातला १२ लाखांचा गंडा, ‘अशी’ लढवली शक्कल..


Pune Crime पुणे : पुण्यात फसवणुकीच्या घटनेत वाढ झाली असून सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा आणि चांगला परतावा मिळवा असे सांगून महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. Pune Crime

याप्रकरणी कात्रज परिसरात राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने सोमवारी (ता.१६) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 2557426XXXXX क्रमांक धारक तसेच टेलीग्राम ग्रुप धारक आणि विविध बँक खातेधारक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ८ मार्च २०२३ ते १४ मार्च २०२३ दरम्यान फिर्यादी यांच्या घरी ऑनलाइन घडला आहे. Pune Crime

मिळालेल्या माहिती नुसार, टेलिग्रामच्यामाध्यमातून पुण्यातील कात्रज परिसरात राहणाऱ्या एका महिलेला अज्ञात व्यक्तीने संपर्क केला. त्यानंतर युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करून पैसे कमवता येईल असे सांगत वेगवेगळे टास्क देऊन १२ लाख ५ हजार रुपये गुंतवण्यास भाग पाडले. मात्र, कोणत्याही प्रकारचा परतावा न देता आर्थिक फसवणूक करत ऑनलाइन गंडा घातला.

दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच याप्रकरणी महिलेने तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी अज्ञात मोबाईल क्रमांक धारक तसेच टेलिग्राम युजर आणि विविध बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे गिरीश दिघावकर करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!