Pune Crime : पुणे हादरले! दारुच्या नशेत मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून, आरोपीला हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या..


Pune Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत झालेल्या किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा निर्घृण खून केल्याची घटना मांजरी येथील मोरे फार्म, शेवाळवाडी येथे घडली आहे. ही घटना शनिवारी (ता.२५) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

संतोष भास्कर अडसूळ (वय.४१, रा. मोरे सोसायटीसमोर, शेवाळेवाडी, मांजरी फॉर्म, माजरी बुद्रुक, पुणे) असे मृत व्यक्तीचे नाव असून, राहुल दत्तात्रय घुले (वय ४१, रा. मांजरी बुद्रुक) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याप्रकणी भास्कर तुकाराम अडसुळ (वय.६४ रा. शेवाळवाडी, पुणे) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Pune Crime

सवसितर माहिती अशी की, संतोष आणि राहुल एका बांधकामाच्या ठिकाणी दारु पित बसले होते. त्या वेळी आरोपीने एक महिन्यापूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरुन संतोष सोबत वाद घालण्यास सुरुवात केली. आरोपी राहुलने संतोषला मारहाण करून, त्याला उचलून जमिनीवर डोके आपटले. त्यात संतोष बेशुद्ध पडला. ते पाहून राहुल पळून गेला.

संतोष घरी न परतल्यामुळे त्याचे वडील घटनास्थळी गेले असता, त्यांना संतोष बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ हडपसर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी संतोषला रुग्णालयात नेले असता, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा तांत्रिक मदतीच्या सहाय्याने शोध घेऊन त्याला शेवाळवाडी याथील काळुबाई मंदिराजवळून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने सांगितले की, जुन्या भांडणाचा राग मनात धरुन संतोष याला हाताने चापट मारली. त्यानंतर त्याला जमिनीवर उचलून आपटून त्याला जीवे मारल्याची कबुली आरोपीने दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मंगल मोढवे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!