Pune Crime : पुण्यात २१ वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करून हत्या, समलैंगिक संबंधातून घडली घटना…


Pune Crime :  दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

प्रेमप्रकरणातून महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणाची कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही हत्या समलैंगिक संबंधातून करण्यात आल्याचा संशय पोलिसांना संशय आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली आहे. Pune Crime

महेश डोके (वय. २१) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. महेश हा वाघोली येथील एका महाविद्यालयामध्ये शिकत होता. तसेच तो येथील एका हॉस्टेलमध्ये राहत होता. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मंगळवारी (ता.२८) रात्री बकोरी रोड वाघोली येथे महेशवर काही हल्लेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. यात गंभीर वार महेश वर करण्यात आल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने त्याच्या मित्रांनी रुग्णालयात भरती केले.

मात्र, त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला ससून रुग्णालयात पुढे पाठवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. महेश हा हा बीजीएस कॉलेज वाघोली येथे बीबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. तो वाघोळी परिसरातील एका होस्टेलमध्ये राहत होता.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, महेशची हत्या ही समलैंगिक संबंधातून झाल्याचा संशय आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहे. या साठी दोन पथके तयार करण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!