Pune Crime : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पुण्यात 33 लाखांची फसवणूक, माय लेकाविरोधात गुन्हा दाखल..


Pune Crime : कंपनीत गुंतवलेली रक्कम दामदुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवून ३१ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आला आहे.

हा प्रकार पुणे शहरातील कल्याणीनगर भागात जून २०२२ मध्ये घडला असून याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी आई आणि मुलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

प्रितेश प्रकाश बाफना, मंगला प्रकाश बाफना (दोघे रा. सार्थक लेन, साई सत्यम पार्क, वाघोली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, आरोपी प्रितेश बाफना याने सर्वप्रथम फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. आमच्या कंपनीत पैसे गुंतवल्यास तुम्हाला पैसे दामदुप्पट करुन देतो असे सांगितले. Pune Crime

फिर्यादी यांनी प्रितेश याच्यावर विश्वास ठेवून अमित एन्टप्रायजेस नावाच्या बँक खात्यात तसेच आरोपीची आई मंगला बाफना यांच्या बँक खात्यात ३० लाख७५ हजार रुपये जमा केले.

तर एक लाख रुपये रोख असे एकूण ३१ लाख ७५ हजार रुपये प्रितेश याला दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपींनी पैसे दामदुप्पट करुन न देता तसेच घेतलेली रक्कम परत न करता आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर पीडित व्यक्तीने पोलिसांता धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!