Pune Crime : काळी जादू केली, गुंगीचे औषध देऊन काढले अश्लिल फोटो, ब्लॅकमेल करत १५ लाख उकळले, महिलेसोबत घडलं भयंकर..

Pune Crime : गुंगीचे औषध देऊन महिलेची छायाचित्रे काढून ती प्रसारीत करण्याची धमकी देत महिलेकडून खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एका भोंदू बाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णनारायण तिवारी (वय.३०), अंतिमा कृष्णा तिवारी (दोघे रा. शक्तीनगर, गौंडा, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या बाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार आणि आरोपी दाम्पत्य ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन तुमच्या घरावर काळी जादू झाल्याचे सांगण्यात आले. काळी जादू नष्ट करतो, असे सांगून आरोपी पुजेसाठी फिर्यादी यांच्या घरी आले.

त्यांनी महिलेला व त्यांच्या लहान मुलीला पिवळ्या रंगाचे कडू चव असलेले गुंगी आणणारे सरबत पिण्यास दिले. सरबत पिल्यानंतर दोघी मायलेकी बेशुद्ध झाल्या. त्यानंतर आरोपीने त्यांचे कपडे काढून मोबाईलमध्ये त्यांचे अश्लील फोटो काढले. हे फोटो फिर्यादीच्या मोबाईलवर पाठवले होते. Pune Crime
दरम्यान, हे फोटो कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्वांना पाठवण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांना ब्लॅकमेल करुन वेळोवेळी पैशांची मागणी केली. पैसे दिले नाही, तर फिर्यादी व मुलीला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. महिलेने धमकीला घाबरून वेळोवेळी ऑनलाईन पैसे पाठवले.
आरोपींनी महिलेच्या घरातील सोन्याचे दागिने व कॅमेरा असा एकूण १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल नेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पतंगे करीत आहेत.