खरातच्या कारनाम्याचे पुणे कनेक्शन ; भक्ताची तब्बल 17 वर्षाची ओळख अन् कमवला भक्कळ पैसा..

पुणे: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता वाढत चालली आहे.अंकशास्त्राच्या नावाखाली भविष्य सांगून आणि जमिनीचे व्यवहार यांचा मेळ बसवत अफाट संपत्ती कमावणाऱ्या खरातच्या कारनाम्यांचे आता ‘पुणे कनेक्शन’ उघड झाले आहे. पुण्यातील एका भक्तानेच खरातला जमिनीच्या व्यवहारातून सोन्यासारखा पैसा कमवण्याचा मार्ग दाखवला असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याची सुमारे 17 वर्षांपूर्वी नर्मदा परिक्रमेदरम्यान पुण्यातील एका भक्ताशी झाली होती. या भक्तानेच खरातला जमिनीच्या व्यवहारातून ‘सोन्यासारखा’ पैसा कमावण्याचा मार्ग दाखवला. तसेंच मोठ्या जमिनी खरेदी करण्यासाठी लागणारे तगडे भागीदारही याच पुणेकर भक्ताने मिळवून दिले. या भागीदारीतून खरातने अल्पावधीतच भरपूर पैसा आणि संपत्ती जमा केली. आता याच भक्तांनी काळे चिट्ठे बाहेर काढण्याचा विडा उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
अशोक खरात याला संपत्तीचा इतका हाव झाला की, ज्या भक्तांनी पैसा कमावण्याचा मार्ग दाखवला त्यांनाही त्याने बाजूला सारले. अफाट नफ्यातील वाटा पुण्यातील भक्ताला आणि मुंबईतील एका दुसऱ्या भक्तालाही मिळाला नाही. या आर्थिक फसवणुकीतून त्यांच्यातील संबंध विकोपाला गेले. त्यामुळे या भक्तांनीच आता खराची साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी विडा उचलला आहे.

दरम्यान.पुण्यातील हा संबंधित शहरातील एकदम पॉश भागात राहातो. दरम्यान आगामी काळात खरातचे आणखी कोणते ‘कारनामे’ चव्हाट्यावर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे