उद्या पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद! पुणेकरांनो पाणी जपून वापरा…

पुणे : यंदा पाऊस लांबणार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आठवड्यात एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामुळे उद्या शहराचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.
यंदा पावसाचे प्रमाण देखील कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांनीच पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदा दुष्काळ देखील पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना यावर्षी 31 जुलैपर्यंत पाणीसाठ्याचे नियोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी ऑगस्टपर्यंत अथवा पुरेसा पाऊस पडेपर्यंत दर गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. याबाबत प्रशासनाने माहिती दिली आहे.