पुणे शहर हादरलं!! स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार, आलिशान सेंटरनध्ये अनेक तरुणींचा धंदा अन्…


पुणे : पुण्यामध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाणेर आणि विमानतळ परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

पुणे पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या छापेमारीत तब्बल १८ तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्यातील १० पेक्षा अधिक तरुणी परदेशी नागरिक असल्याचे उघड झाले आहे. या धडकेत पुण्यात चालणाऱ्या उच्चभ्रू भागातील स्पा सेंटरच्या आड चालणाऱ्या अनैतिक रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

विमानतळ परिसरात असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायातून एकूण १६ मुलींची सुटका करण्यात आली आहे. या १६ मुलींपैकी १० परदेशी आणि २ भारतीय आहेत. या स्पा सेंटरच्या जागा मालकासह, स्पा सेंटर मालक आणि मॅनेजर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

दुसऱ्या कारवाईत, उच्चभ्रू अशी ओळख असलेल्या बाणेरमध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई करत एका स्पा सेंटरवर छापा टाकला. या कारवाईत २ मुलींची सुटका करण्यात आली आहे. या स्पा सेंटरच्या मालकावर तसेच स्पा चालवणाऱ्या मॅनेजरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात आणि बाणेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात किरण ऊर्फ अनुराधा बाबूराव आडे (वय.२८ , रा. खराडी) या महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्यावर पीटा कायदा, पोक्सो कायदा आणि भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत १५ आणि १७ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसह एकूण पाच पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!