Pune : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत बदल, जाणून घ्या सगळे पर्यायी मार्ग….


Pune : महाराष्ट्रामध्ये मुंबई-पुण्यासह अनेक शहरांत गणेशोत्सवाची धामधूम सुरु झाली आहे. येत्या ७ सप्टेंबरला म्हणजेच उद्या घरोघरी तसेच मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होतील. गणेश मंडळांकडून श्रींच्या प्रतिष्ठापणेनिमित्त मिरवणुका काढण्यात येतात.

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शनिवारवाडा परिसरात गणरायाच्या मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होतेय. त्यामुळे डेंगळे पूल ते शिवाजी पूल, कसबा पेठ, जिजामाता चौक, सारसबाग परिसरातील सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर (सिंहगड रस्ता) वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.

कसा राहणार वाहतुकीचा मार्ग…

छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक (मंडई) परिसरात वाहतुकीस बंद राहणार आहे. वाहनचालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.

तसेच संचेती चौकाकडून छत्रपती शिवाजी रस्त्याने सस्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक रस्त्याने इच्छितस्थळी जावे.

सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर परिसरात मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. या भागात वाहनचालकांनी वाहने लावू नयेत. मुंढव्यातील केशवनगर भागात मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी विचारात घेऊन या भागात वाहतूक बदल केले आहेत.

शिवाजी रस्त्यावरून स्वारगेट कडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल केला आहे. स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, टिळक रस्तामार्गे या बस जातील. महापालिकेकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली आहे.

वाहतुकीस खुले राहणारे रस्ते..

फडके हौद चौक ते जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक, अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक ते मोती चौक, तसेच मंगला चित्रपट- गृहसमोरील प्रिमिअर गॅरेज गल्ली ते खुडे चौक हे रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!