Pune Breaking News : कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; येरवडा कारागृहात संपवले आयुष्य..
पुणे : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवुन टाकणाऱ्या कोपर्डी हत्याकांड प्रकरणासंबंधी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या हत्याकांडातील आरोपी जितेंद्र शिंदे याने पुण्यातील (Pune Breaking News) येरवड्या कारागृहातील बराकमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Pune Breaking News)
मिळालेल्या माहिती नुसार, अहमदनगर (Ahmednagar ) जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.
या अत्याचार प्रकरणातील आरोपी जितेंद्र शिंदे (Jitendra Shinde) याने पुण्यातील येरवडा कारागृहात गळफास घेत आत्महत्या केली. जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे हा या अत्याचार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. रविवार (ता.१०) सकाळी त्याने येरवडा कारागृहात बराकीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जेल प्रशासन हादरुन गेले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, शिक्षा भोगत असतानाच आरोपीने आत्महत्या केल्याने कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.