Pune : उरुळी कांचन, लोणी काळभोर शेवाळेवाडी येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टरच्या ३० विद्यार्थ्यांची राष्ट्रीय ॲबॅकस स्पर्धेसाठी निवड..

Pune : पुणे विभागीय अबॅकस स्पर्धेमध्ये विविध गटातून उरुळी कांचन, लोणी काळभोर आणि शेवाळेवाडी येथील विविध गटातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही कॉम्पिटिशन स्पर्धा स्वारगेट येथील गणेश क्रीडा मंच पुणे या ठिकाणी सोमवारी व मंगळवारी पार पडली.
विभागीय स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नॅशनल कॉम्पिटिशन साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर उरुळी कांचन, लोणी काळभोर शेवाळेवाडी येथील ३० विद्यार्थी नॅशनल कॉम्पिटिशन साठी निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे… Pune
प्रथम क्रमांक – आयुष जाधव, आदित्य महानवर, अर्णव रहाणे, अन्मेय गवळी, मयंक गेंड, अभिराज रहाणे, शरयू सोनाळे, स्वराज जाधव
द्वितीय क्रमांक – विती प्रिया, आनंदी शितोळे, विराज मोडक, अर्णव कलेल, जानवी गावडे, तनिष्का जाधव, पूर्वी नलावडे.
तृतीय क्रमांक – अनविरा जगताप, अथर्व चौधरी, पुष्कराज देवकर, रिद्धेश निकाळजे, सौम्या बडेकर, खुशी खराडे, अर्णव गायकवाड, सोहम टिळेकर, शर्वरी कुंभार, आयुष्य गव्हाणे, अर्जुन शितोळे, प्रद्युम्न गोते, श्रेया काळभोर, करण चौधरी, स्वराज चौधरी, अशी माहिती एन आय बी एम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन मास्टर चे डायरेक्टर नवनाथ हंबीर यांनी दिली आहे.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांची तयारी किरण शेळके, वैष्णवी शिंदे, क्षितिजा ठाकूर, अक्षदा बडदे, प्रिया सडके यांनी करून घेतली होती. अबॅकसमुळे मुलांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये खूप वाढ झाली असून विविध बदल होत आहेत त्याचबरोबर पालकांचा कल त्याकडे वाढला आहे.