Pune : शिवाजीनगर मतदार संघात मोठा राडा! दोन गट समोरासमोर, बंदूक, तलवार, अन् कोयत्याचा वापर….
Pune : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीआधी अनेक नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे.
तसेच विधानसभा निवडणुकीत मतदानाला आता काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. यामुळे प्रचाराला जोर वाढला आहे. राज्यात अनेक बड्या नेत्यांचा सभा होत आहे.
तसेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी नगर मतदारसंघात गुरुवारी रात्री तुफान राडा झाला. भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारादरम्यान संगमवाडी येथे दोन गटात राडा झाल्याचे सांगण्यात आले आहे. Pune
दरम्यान, या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास एक तास हा राडा सुरू असून कोयता, तलवारी, बंदुकीचा वापर करण्यात आला. या घटनेने नंतर एकच खळबळ उडाली आहे.