Pune : पुण्यात पुन्हा दहशतवादी बॉम्बस्फोट हल्ला? पोलीस आयुक्तांच्या पत्राने खळबळ, पत्रात नेमकं काय?


Pune : पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे. सतत गर्दीने गजबजणाऱ्या “त्या” हॉटेलला पत्र लिहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धोका असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.

पुणे पोलीस आयुक्त यांनी अमितेश कुमार पत्राद्वारे भीती व्यक्त केली आहे. सतत गर्दी होत असल्यामुळे “या” हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेकदा नोटीस बजावल्या आहेत. हॉटेल मधील डिस्कोथेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत सुरक्षेचा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केला आहे.

पत्रात काय लिहलं आहे?

आपल्या डिस्कोथेक आस्थापनेने वेळोवेळी नियम व कायदे, अटी व शर्थीचा भंग केला असल्याने, आपल्यावर वेळोवेळी कारवाया करण्यात आल्या असुन आपले वर्तनात कोणताही फरक पडत नाही. आपणावर कायद्याचा कोणताही धाक राहिला नसुन प्रशासनाने दिलेल्या सुचनाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असुन एक प्रकारची प्रशासनाची अवहेलनाच आपले मार्फतीने सुरु आहे.

आपण काहीही केले तरी आपले कोणीच काही करु शकत नाही, अशी आपली धारणा झालेली दिसत आहे. तसेच सदर ठिकाणी कोणतीही चोख सुरक्षा व्यवस्था नसुन आपल्या हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असल्याने सदर ठिकाणी एखादी आपत्कालीन घटना (उदा. आग, चेंगराचेंगरी, अफवा, गॅसगळती) झाल्यास कोणत्याही प्रकारची पर्यायी प्रभावी सुरक्षा यंत्रणा नाही त्यामुळे अशा वेळी मोठ्या प्रमाणात मनुष्य तसेच संपत्तीची हानी होऊ शकते आपली आस्थापना ही कमी जागेत जास्त गर्दी जमवत आहे.

आपले हॉटेलेमध्ये लोक दारु पिऊन धिंगाणा करीत असतात त्यांना त्यांचे कोणतेही भान राहत नाही सध्या अतिरेकी कारवाया बाबत अलर्ट आहे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवुन त्यातुन मोठया प्रमाणात जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!