पुण्यातील बांधकाम व्यावसायिक शरद पवार यांचे निकटवर्ती अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड…!
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्ती पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेले सिटी ग्रुपचे सीईओ अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत.
देशपांडे यांच्याशी संबंधित ८ ठिकाणी आयकर विभागाचे अधिकारी धडकले आहेत. त्यांचे घर आणि कार्यालयाची पहाटेपासून झाडाझडती घेतली जात असल्याचं पुढे आलं आहे.
अनिरुद्ध देशपांडे यांच्यावरील आयकर विभागाच्या धाडीमुळे पुण्यातील उद्योग जगतात खळबळ उडाली आहे. शहरातील बड्या राजकारण्यांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याने राजकीय वर्तुळात देखील चर्चेला उधाण आलं आहे.
Views:
[jp_post_view]