Pune Accident : दोन तास अन् १४ फोनकॉल, विशाल अग्रवाल आणि डॉ. अजय तावरे यांच्यात नेमका कोणता संवाद?

Pune Accident : पुण्यातील कल्याणी नगर अपघाताला आता काही दिवस उलटले असून, सदर प्रकरणाच्या तपासालाही वेग आला आहे. आता अजून एक खुलासा समोर येत आहे. या प्रकरणात आता मोठी माहिती हाती आली आहे.
अल्पवयीन मुलाचे म्हणजेच लाडोबाच्या वडीलांनी डॉ. अजय तावरेला तब्बल १४ फोन कॉल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हे कॉल सकाळी ८.३० ते १०. ४० या दरम्यान करण्यात आले. सकाळी ११ वाजता आरोपीचा रक्त नमुना घेण्यात आला. विशेष म्हणजे कोणाला संशय येऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप कॉल केले होते.
दोघांचे संभाषण झाल्याचे ‘सीडीआर’ (कॉल डिटेल रेकॉर्ड) वरून समोर आले आहे. ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यात आला होता. त्यासाठी अल्पवयीन तरुणाचे वडील विशाल अग्रवाल याने ससूनमधील डॉ. अजय तावरेला व्हाटसॲप कॉल केला. Pune Accident
कल्याणीनगरमधील पोर्श कार अपघात १९ मे रोजी घडला. दुसऱ्या दिवशी आरोपीचा रक्त नमुना बदलल्याचा खुलासा पोलिसांनी केला होता. प्रकरणात सरकारी रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागातील मुख्य डॉ. अजय तवारे आणि डॉ. श्रीहरी हळनोर, अतुल घाटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे.
पैशांच्या बदल्यात रक्त नमुना बदल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलाने दारुचे सेवन न केल्याचे सिद्ध करण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला होता. या घटनेने सध्या पूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.