Pune Accident : पुणे अपघात प्रकरणातील पोर्शे कारबाबत भयंकर माहिती आली समोर, पुणे RTO ने दिली महत्वाची माहिती…


Pune Accident : पुणे शहरातील हिट अँड रन प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात दोघांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अल्पवयीन आरोपीला कारवाईऐवजी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा आरोप पोलीस प्रशासनावर होत आहे.

एकीकडे या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असतानाच आता या अपघातातील महागड्या पोर्शे कारसंबंधी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही कार पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवासायिक विशाल अगरवाल यांची असून ही महागडी कार परराज्यातून आणली आहे.

शोरुमधून नवे वाहन खरेदी केल्यानंतर वाहतुक नियमांनुसार त्याची नोंदणी झाल्यानंतर, आरटीओकडून अधिकृत नंबर आल्यानंतरच गाडी रस्त्यावर उतरवली जाते. गाडी खरेदी केल्यानंतर ही सर्व नियमांनुसार प्रक्रिया करुन मालकाच्या ताब्यात देण्याची जबाबदारी संबंधित शोरुमकडे असते. मात्र पुण्यात दोघांचा बळी घेणाऱ्या पोर्शे कारची अधिकृत नोंदणीच झाली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. Pune Accident

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात गाडी विकली गेली असती तर येथील डीलरकडून गाडीचे रजिस्ट्रेशन झाले असेत. डिलकरडून तात्पुरते रजिस्ट्रेशन केले जात नाही. या प्रकरणात गाडी परराज्यातून आली आहे.

त्यामुळे परराज्यातून गाडी येताना दुसऱ्या राज्यासाठी तिथला डीलर तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन देतो. या तात्पुरत्या रजिस्ट्रेशनवर विना क्रमांक ही गाडी आपल्या राज्यात आणली जाऊ शकते, मात्र रस्त्यावर चालवायची म्हटली तर ती तात्पुरती किंवा कायम स्वरुपी रजिस्ट्रेशन असल्याशिवाय आणता येत नाही.

गाडी मालकाने मार्चमध्ये रजिस्ट्रेशनचे पैसे भरले. गाडी निरिक्षकाला दाखवली होती. मात्र, गाडीचा कर भरणे आवश्यक आहे. तो कर गाडी मालकाने भरला नाही. जोपर्यंत गाडी मालक गाडीचा कर भरत नाही तोपर्यंत त्याला आरटीओ कडून क्रमांक दिला जात नाही.

बाहेरच्या राज्याने तात्पुरते रजिस्ट्रेशन करुन दिले होते. यात मुंबईच्या डीलरने गाडीचे बुकिंग घेतलेले आहे. या डीलरची गाडीचे रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी होती. पण त्याने ते केले नाही. गाडीच्या रजिस्ट्रेशनची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलाने विनाक्रमांक नव्हे तर विना रजिस्ट्रेशन गाडी चालविली आहे, असे भोर यांनी सांगितले.

समोर आलेल्या माहितीनुसार, उद्योगपती विक्रम अगरवाल यांची ही गाडी २० मार्च रोजी मुंबईतील एका डिलरने परराज्यातून आणली होती. त्यानंतर गाडी नावावर करण्यासाठी अर्ज करण्यात आला. आरटीओकडून गाडीची तपासणी झाली. गाडीच्या किंमतीनुसार ४० लाखांचा कर भरण्यास सांगण्यात आले होते.

मात्र ही कराची रक्कम न भरता, गाडीची नोंदणी प्रक्रिया न करताच ती रस्त्यावर आणण्यात आली. तसेच लायसन्स नसलेल्या १७ मुलाच्या ताब्यात दिल्याचे उघडकीस आले आहे. विनानंबर, विना परवाना गाडी रस्त्यावर चालवणे हा मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे. तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसनेही गुन्हा आहे.

त्यामुळे पोर्श या अलिशान गाडी चालकावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ज्या दिवसांपासून गाडी खरेदी केली आहे, त्या दिवसांपासून कराच्या रकमेवर दंडाची रक्कम आकारली जाईल. दरम्यान, याप्रकरणी विशाल अगरवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!