Pune Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरण; मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा, बाल न्याय मंडळाच्या सदस्यांना कारणे दाखवा नोटीस..


Pune Accident :  पुण्यातील कल्याणनगर भागात घडलेल्या पोर्श कार अपघात प्रकरणाने, राज्यभरात खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय या प्रकरणी दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत.

या घटनेतील अल्पवयीन आरोपीला घटनेनंतर जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळाने जी भूमिका घेतली, त्यावर आता चौकशी समितीनेही आक्षेप नोंदवला आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत दोघांना धडक दिली होती. दरम्यान या अपघातात दोन तरुण अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातातील अल्पवयीन आरोपी मुलाला बाल न्याय मंडळात हजर करण्यात आले.

त्यावेळी अपघातावर ३०० शब्दांचा निबंध लिहिणे, वाहतूक पोलिसांबरोबर पंधरा दिवस वाहतुकीचे नियोजन करणे आणि मद्याचे व्यसन सोडविण्यासाठी उपचार घ्यावेत, अशा अटी, शर्तीवर मुलाला १५ तासात जामीन मंजूर करण्यात आला होता. बाल न्याय मंडळाच्या निर्णयावर विविध संघटनांनी टीका केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊन मंडळाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. Pune Accident

अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बाल न्याय मंडळातील सदस्यांनी निकषांचे पालन केले की नाही, याची पडताळणी करण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने २२ मे रोजी पाच सदस्यांची समिती नेमली होती. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतूदींनुसार या समितीची स्थापन करण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!