Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचा आमदार फसला! ससुनच्या ‘त्या’ डॉक्टरची केली होती शिफारस, आता पत्रच झालं व्हायरल…


Pune Accident : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहे. यात अनेक जण गोत्यात येत आहे, पुणे पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससुनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक केली आहे.

ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी हे नमुने बिल्डर विशाल अगरवाल याच्या मुलाला वाचवण्यासाठी कचऱ्यात फेकल्याचे तपासात पुढे आले आहे.

या डॉक्टरला ससुनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी अशा आशयाचे शिफारस पत्र हे अजित पवार गटाचे आमदार सुनील टींगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले असल्याचे उघड झाले आहे. हे पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. आधी पोलिस ठाण्यात गेल्याने आणि आता हे पत्र पुढे आल्याने सुनील टिंगरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

सुनिल टिंगरे यांचे स्पष्टीकरण..

हे पत्र समोर आल्यानंतर सुनिल टिंगरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, आज माझ्या शिफारस पत्रावरून ज्या बातम्या सुरू आहेत त्यावरून या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. वास्तविक मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत असतात. यामध्ये शाळा प्रवेश, वैद्यकीय उपचार, विनंती बदली आणि इतर अनेक कारणांसाठी शिफारस पत्रे नागरिकांकडून मागितली जातात.

तसेच प्रत्येक शिफारस पत्राच्या खाली कायदेशीर बाबींची पूर्तता करून योग्य ती कार्यवाही करावी, असा उल्लेख असतो. त्यामुळे योग्य बाब असेल तरच संबंधित विभागाकडून कार्यवाही होत असते. त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देणं योग्य ठरणार नाही. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून चौकशीअंती ही बाब स्पष्ट होईल’, असं सुनिल टिंगरे म्हणाले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!