Pune Accident News : पुण्यात रस्त्याने चालत जाणाऱ्या शेतमजूरांना भरधाव कारने चिरडले, तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी..


Pune Accident News पुणे : गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील कामे उरकून घरी निघालेल्या ५ शेतमजुरांना भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Pune Accident News)

जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कल्याण -अहमदनगर मार्गावर रविवारी (ता. २४) रात्रीच्या सुमारास घडली आहे.

जगदीश महेंद्रसिंग डावर, सुरमल मांजरे, दिनेश तारोले अशी मृत झालेल्या तिघांची नावी आहेत.

मिळालेल्या माहिती नुसार, मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (ता.२४) रात्री ८ च्या सुमारास मध्य परदेशातून आलेले हे ५ मजूर शेतातील कामे उरकून पायी घरी जात होते. डींगोरे येथील दत्त मंदिरापासून जात असतांना यावेळी या मार्गाने भरधाव वेगात असलेली एक कार आली.

यावेळी कारचालकाचे गडीवरील नियंत्रण अचानक सुटले. काही कळण्याच्या आतच या कारने मजुरांना चिरडले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला.तर एकाचा दवाखान्यात उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोघा जखमींना आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले आहे. तसेच घटणस्थळाचा पंचनामा देखील करण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, कल्याण-अहमदनगर महामार्गावर गेल्या काही वर्षांत वर्दळ वाढली आहे. मात्र याच महामार्गाची गेल्या काही वर्षांपासून दयनीय अवस्था पाहायला मिळत आहे. बेशिस्तपणे वाहतुकीमुळे अपघातांची मालिकाच सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!