Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी मुलाच्या वडिलांना जामीन मंजूर, पण मुक्काम येरवडा जेलमध्येच, नेमकं घडलं काय?

Pune Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. पुण्याच्या कल्याणी नगर येथील अपघात प्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला जामीन मंजूर झाला आहे.

विशाल अग्रवाल यांच्यावर दाखल असलेल्या तीन पैकी एका गुन्ह्यात त्यांना जामीन मंजूर झाल्याने त्यांची तुरुंगातून सुटका होणार होती. मात्र, आणखी दोन गुन्ह्यात ते न्यायालयीन कोठडीत असल्याने आरोपी विशाल अग्रवालचा मुक्काम अद्यापही तुरुंगातच असणार आहे.
पुणे सत्र न्यायालयाने काही अटीशर्तींवर विशाल अग्रवालला जामीन मंजूर केला आहे. विशाल अग्रवालला आज जामीन मंजूर झाला असला तरी त्याला तपास यंत्रणांना तपासासाठी सहकार्य करावं लागणार आहे.

याच अटीच्या आधारावर विशाल अग्रवालला जामीन मंजूर करण्यात आला आहे. असं असलं तरीही विशाल अग्रवालची आज सुटका झालेली नाही. त्याची रवानगी आज पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. Pune Accident
दरम्यान, १९ मे रोजी पुण्यातील कल्याणी नगर चौकात भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गाडी चालवत असलेल्या अल्पवयीन मुलासह त्याच्या आई-वडिलांसह आजोबांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अग्रवाल कुटुंबीयांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले असून सध्या अख्ख कुटुंब न्यायालयीन कोठडीत आहे.