Pune Accident : फिर से दिखा दुंगा सडक पे खेल’, माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, व्हिडिओ व्हायरल होताच…


Pune Accident पुणे : महाराष्ट्राची शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील पोर्शे कार भीषण अपघातातील अल्पवयीन मुलास न्यायालयाने १५ तासांतच जामीन मंजूर केला होता. दोन निष्पाप जीवांचा बळी घेतल्यानंतरही १५ तासांत जामीन मिळाल्याने सोशल मीडियातून संतापाची लाट उसळली.

अशातच आता अपघातानंतर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण रात्री त्याच्या इन्स्टाग्रामवर रॅप गाणे गाताना दिसत आहे. ज्यामध्ये तो अपशब्द वापरत असल्याचा आरोप आहे.

पुण्यातील कार अपघाताचाही व्हिडिओमध्ये उल्लेख आहे. हा व्हिडिओ अल्पवयीन आरोपीचा असल्याचा दावा केला जात आहे. शिवीगाळ करणाऱ्या रॅप गाण्याचा सेल्फी व्हिडिओ काढलेला दिसत आहे. Pune Accident

दरम्यान, आरोपीच्या कुटुंबीयांनीही हा व्हिडिओ त्यांचा नसल्याचं म्हटलं आहे. हा व्हिडिओ डीपफेक आहे का, एआय वापरून तयार करण्यात आला आहे का, याचा तपास पुणे पोलिसांनी सुरू केला आहे.

हा व्हिडीओ आरोपीचा नसून तो खोटा असण्याची शक्यता आहे. हा व्हायरल व्हिडिओ एआय टूल्सचा वापर करून बनवण्यात आल्याचा अंदाज पुणे पोलिसांनी व्यक्त केला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय?

व्हिडीओ मध्ये म्हंटले आहे की, “मुझे बेल मिल गई है, मैं तुम्हें सड़क पर फिर से खेल दिखाऊंगा. मेरे साथ चार दोस्त थे, वो तो सीधे मेरी…मैं नशे में चूर हूं. वह जोड़ा मेरे पोर्शे के सामने आ गया. मुझे 1 दिन में जमानत मिल गई. मैं तुम्हें फिर सड़क का खेल दिखाऊंगा.” सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!