Pune Accident : मुलाला वाचवण्यासाठी कसा रचला कट, रक्त कसं बदलले? दोघांना मारणाऱ्या पोराला वाचवण्यासाठी अग्रवाल नवरा बायकोचा सगळा घटनाक्रम आला पुढे….


Pune Accident : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. बेदरकारपणे आपल्या बापाच्या महागड्या कारनं दोघांना चिरडणारा धनिकपुत्र आणि अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचे धक्कादायक वास्तवही या प्रकरणात समोर आले आहे.

रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईला अटक करण्यात आली आहे. यानंतर आता मोठा खुलासा समोर समोर आला आहे. अल्पवयीन पोराचे ससून रुग्णालयामधील घेण्यात आलेलं रक्ताचे सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर घेण्यात आलेलं सॅम्पल कोणाचे अशी चर्चा रंगली होती.

आता हे रक्त त्या अल्पवयीन पोराच्या आईनेच दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. शिवानीला अटक केल्यानंतर तिने चौकशीत कबुली दिली आहे. माझा मुलगाच गाडी चालवत होता, याचीही कबुली आई-वडिलांनी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्वात मोठा धक्कादायक उलगडा झाला आहे. Pune Accident

मुलाची आई शिवानी आणि वडील विशाल अग्रवालने या दोघांनी मिळून हा कट रचला होता. अपघात झाल्यानंतर शिवानी अग्रवाल आणि विशाल अग्रवाल दोघेही ससून रुग्णालयामध्ये उपस्थित असल्याचे समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर ससूनच्या सीसीटीव्हीमध्ये विशाल अग्रवाल दिसून आला होता.

दरम्यान, पोर्शे कार अपघातात आतापर्यंत अल्पवयीन पोराचा बाप विशाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल तसेच आई देखील गजाआड झाली आहे. काल पुणे पोलिसांनी शिवानी अग्रवालला अटक केली होती. ससूनच्या डॉक्टरांनी सॅम्पल कचऱ्यात फेकल्याचे समोर आल्यानंतर बदललेले अल्पवयीन पोराच्या आईचे होते, असा संशय पोलिसांना होता.

त्यामुळे पोराला वाचविण्यासाठी रक्ताचे सॅम्पल बदलणे, डॉक्टरांना पैसे पुरविणे आदी प्रतापही केले होते. शिवानीने ससूनमध्ये ब्लड सँम्पल दिले होते. डॉ. श्रीहरी हळनोरने हे सॅम्पल बदलले होते. यासाठी तीन लाख रुपये देण्यात आले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!