Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी अगरवाल कुटूंबाचे पाय अजून खोलात, अजून एक गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?


Pune Accident : पुण्यातील कल्याणी नगर परिसरात पोर्शे कारने दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती. तसेच या अपघाताची पुण्यासह संपूर्ण राज्यात चर्चा सुरु आहे.

याप्रकणी आता या अपघातातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल व त्याच्या भावावर हिंजवडी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. २००७ साली बांधण्यात आलेल्या नॅन्सी ब्रह्मा सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी अगरवाल बंधूसह पाच जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच ७१ सोसायटी धारकांना पार्किंग, मोकळी जागा देणे बंधनकारक असताना तीन सोसायटी तयार करुन एकाच ठिकाणी अँमिनीटी स्पेस व मोकळी जागा दर्शवून सोसायटी धारकांची परवानगी नसताना बिल्डरने वॅन्टेज टॉवर ही ११ मजली आणि वॅन्टेज हाय ही १० मजली इमारत बांधून फसवणूक केली.

याप्रकरणी विशाल अरुण अडसूळ (वय.४२ रा. नॅन्सी ब्रह्मा रेसिडंसी को. ऑ. हौसिंग सोसायटी, बावधन, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विशाल सुरेंद्रकुमार अगरवाल, राम कुमार अगरवाल , विनोद कुमार अगरवाल , नंदलाल किमतानी, अशिष किमतानी व इतरांवर आयपीसी 420, 409, 34 सह मोफा कायदा कलम 3, 7, 11, 13 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, २००७ साली बावधन येथे बांधण्यात आलेली नॅन्सी ब्रह्मा को. ऑप. हौ. सोसायटी मध्ये ७१ जणांनी फ्लॅट घेतला होता. याच सोसायटीच्या मालकीची त्याठिकाणी पार्किंग आणि अँमीनीटी स्पेस, मोकळी जागा आहे. मात्र, एकाच ठिकाणची जागा वेगवेगळ्या नकाशावर दर्शवून नकाशात फेरबदल करुन तसे नकाशे मंजूर करुन घेतले. Pune Accident

नॅन्सी ब्रह्मा सोसायटीच्या सभासदांची कोणतीही परवानगी नसताना बिल्डर विशाल अगरवाल यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करुन सोसायटीच्या जागेवर ११ मजली इमारतीत ६६ कमर्शियल ऑफिस बांधले तर १० मजली इमारतीत २७ सदनिका आणि १८ शॉप्स बांधून नॅन्सी ब्रह्मा को. ऑप. हौ. सोसायटी. ली. सोसायटी धारकांचा विश्वासघात करुन फसवणूक केली.

विशाल अडसूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विशाल अगरवाल व त्याच्या भावांसह इतरांवर महाराष्ट्र ओनरशिप अॅक्ट (मोफा) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ पांचाळ करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!