Pune Accident : बालसुधारगृहामध्ये आरोपीचा पिझ्झा-बर्गरचा लाड बंद, घरच्या जेवणही मिळणार नाही…


Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील कार अपघातामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली असून दोघांचा जीव घेणाऱ्या त्या अल्पवयीन मुलाला सध्या बालसुधारगृहात ठेवण्यात आलं आहे. शनिवारी मध्यरात्री झालेल्या या अपघातानंतर मध्यप्रदेशातील दोघांचा जीव गेला.

रविवारी पहाटे अपघातानंतर या धनिकपुत्राला जेव्हा येरवाडा पोलीस ठाण्यात आले तेव्हा मागच्या दाराने त्याच्यासाठी पिझ्झा आणि बर्गर आणण्यात आल्याचा आरोप झाला होता. मात्र, बालसुधारगृहात या धनिकपुत्राचे सगळे लाड बंद करत त्याला घरचे जेवण देण्यास मनाई करण्यात आली आहे. Pune Accident

बालसुधारगृहात पहिल्या दिवशी या धनिकपुत्राला सकाळच्या नाश्त्याला पोहे, दूध आणि अंडी देण्यात आली. त्यानंतर त्याला प्रार्थनेसाठी नेण्यात आले. प्रार्थना संपल्यानंतर या मुलाचे समुपदेशन करण्यात आले. तर दुपारी आणि रात्रीच्या जेवणातही धनिकपुत्राला चपाती आणि भाजी असे साधे जेवणच देण्यात आले.

दरम्यान, या धनिकपुत्राला ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश बालहक्क न्यायालयाने दिले होते. त्यानंतर त्याला पुन्हा एकदा न्यायालयात सादर करण्यात येईल.

या मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांनादेखील तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर नातवाच्या प्रतापामुळे त्याचे आजोब सुरेंद्रकुमार अग्रवाल यांच्या पाठीशीही एका जुन्या गुन्हेगारी प्रकरणात चौकशीचा ससेमिरा लागण्याच शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!