Pune : अंत्यविधी करून निघालेल्या लोकांमध्ये ट्रक घुसला, ३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी..


Pune : अंत्यविधी उरकून घरी निघालेल्या नागरिकांच्या गर्दीत नगरकडून भरधाव वेगाने येणारा ट्रक शिरला. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू, तर अनेक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

हा अपघात नगर-कल्याण महामार्गावरील गुळंचवाडी (ता.जुन्नर) येथे शुक्रवारी (ता.१९) रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला. यावेळी ट्रकने महामार्गावर असलेल्या आठ ते दहा वाहनांना धडक दिली असून त्याचे मोठे नुकसान झाले आहे. Pune

जखमींना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. आळेफाटा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिकांनी महामार्गावर आंदोलन सुरु केले आहे. अपघातात मृत्यू व जखमींची सख्या वाढू शकते , अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!