Pune Accident : भोर जवळील देवडी गावात ट्रक व कारचा भीषण अपघात , दोघांचा जागीच मृत्यू ..!!
पुणे : भोर तालुक्यातील देवडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत ट्रक आणि कारचा भीषण अपघात होऊन दोघे
जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. तर दोन वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किकवीकडून कापूरहोळमार्गे सासवडकडे निघालेली कार देवडी गावाजवळ आली असता ट्रक सासवडकडून कापूरहोळकडे निघाला असताना ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनांची भीषण धडक झाली आणि यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात एवढा भयानक होता की, कार ट्रकच्या खाली घुसली. या धडकेमध्ये कारच्या चालकासह एका महिलेचा जागी मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये दोन वर्षाच बाळ आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Views:
[jp_post_view]