Pune : लवासामध्ये मोठी दुर्घटना, दरड कोसळल्याने दोन व्हिला मातीखाली, अनेकजण बेपत्ता…
Major disaster in Lavasa

Pune : काल पासून (ता.२४ ) पुण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. विक्रमी अशी पावसाची नोंद पुणे जिल्ह्यात झालीये. नदी-नाले तुडुंब भरले आहेत.त्यामध्ये लवासामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.
लवासामध्ये दरड दोन व्हिलांवर कोसळली आहे. व्हिलामध्ये तीन ते चार लोक राहत असल्यांची माहिती मिळत आहे. चार लोक बेपत्ता आहेत. स्थानिक लोकांनी यासंदर्भातील माहिती दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्यामध्ये काल सकाळपासून पाऊस सुरु आहे. आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. पुणे शहरापासून जवळच असलेल्या लवासामध्ये दरड कोसळली आहे. काही लोक बेपत्ता आहे. अद्याप बचावपथक घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक लोक मदतीचे काम करत आहेत. Pune
दरम्यान मुसळधार पावसामुळे ही मोठी दुर्घटना लवासामध्ये घडली आहे. तेथील परिस्थिती सध्या अतिशय दैनिय असून, कोणतही बचावकार्य तिथे पोहोचले नसल्याची माहिती समोर येत आहे.