Pune : पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचे १३ लाख पनवेलमध्ये नको ‘त्या’ कामाला उधळले, मग पत्नीने केले असे काही की…
Pune : पत्नीच्या नावे असलेल्या गॅस एजन्सीचे पैसे स्वतः च्या बँक खात्यावर वळवून घेतले. त्यातील ३ लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना आणि १० लाख रुपये सोने खरेदी करण्यासाठी दिले. यासह एकूण ३ कोटी ७४ लाख ७९ हजार ८४७ रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आला आहे.
याप्रकणी ३१ वर्षीय पत्नीने महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत रावसाहेब पोटे (वय-३१, रा. चिंबळी, ता. खेड) असे अपहार केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार १ एप्रिल २०२३ ते १५ मे २०२४ या कालावधीत चाकण औद्योगिक भागातील महाळुंगे इंगळे (ता. खेड) पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
सविस्तर माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी हे नात्याने पती-पत्नी आहेत. फिर्यादी यांच्या नावे असलेल्या ममता गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहण्याची मुभा घरजावई असलेले पती हनुमंत यांना दिली होती. हा व्यवहार पाहत असताना ग्राहकांकडून आलेले पैसे हनुमंत यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःच्या बँक खात्यावर घेतले. Pune
त्यातील तीन लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना करीना राज व मुस्कान यांना दिले. १० लाख रुपयांचे सोने खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून दिली. एकूण३ कोटी ७४ लाख ७९ हजार ८४७ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलिस करीत आहेत.