मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने जात असतानाच आंदोलकाचा मृत्यू ; नेमकं काय घडलं?

मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहेत. सर्व मराठा बांधव थेट मुंबई गाठत असतानाच आता आंदोलनादरम्यान एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,सतिष देशमुख असं मृत व्यक्तीचं नाव आहे. मराठ्यांचे वादळ मुंबईच्या दिशेने धडकणार असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर जरांगे पाटील गेले होते. दरम्यान, किल्ल्याच्या पायथ्याशी एका 45 वर्षीय मराठा बांधवांचा मृत्यू झाला आहे.या मराठा आंदोलकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत व्यक्ती वरडगाव केज येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल, मनोज जरांगे पाटील हे जुन्नरमध्ये दाखल झाले असताना आज सकाळी किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यास गेले होते. तेथून निघतानाच पायथ्याशी एका आंदोलकाचा मृत्यू झाला. या आंदोकाला श्रद्धांजली वाहून आणि त्याच्या कुटुंबीयांचे सात्वन करून जरांगे पाटील आता मुंबईकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मुबंई जात असताना अहिल्यानगर पोहतील आणि ते या ठिकाणी मराठा समाज बांधवशी संवाद साधतील.
