पुण्यात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय! गुन्हे शाखेने छापा टाकला अन् दृश्य पाहून सगळेच हादरले..


पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. कारवाईत पोलिसांनी पाच तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची या दलदलीतून सुटका केली आहे.

तर तरुणींना वेश्याव्यवसायास प्रवुत्त केल्याप्रकरणी मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाला अटक केली आहे. नगर रस्त्यावरील चंदननगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे.

राहुल सुनील सिंह (वय २४, रा. समर्थ काॅम्प्लेक्स, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सैबू शेख उर्फ सैबू मुबारक अली (रा. श्रीराम सोसायटी, चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचमधील पोलीस हवालदार स्वाती तुपे यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नगर रस्त्यावरील चंदननगर भागात इमारतीत मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाला गुरुवारी (३ एप्रिल) मिळाली. या माहितीची बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली.

नंतर पोलिसांच्या पथकाने येथे छापा टाकला. तेव्हा मसाज पार्लरमधून पाच तरुणींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी राहुल आणि सैबू यांनी तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, पोलिसांनी राहुलला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, मुलींची सुटका करून त्यांना रिमांड होममध्ये पाठविण्यात आले आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक सीमा ढाकणे अधिक तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!