नायगावमध्ये घरफोडी केल्याचा प्रकार उघडकीस, सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

उरुळी कांचन : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील रेल्वे गेट नंबर 07, घुलेवस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा ७० हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
ही घटना रविवारी (ता.०६) रात्री १२ ते सोमवारी (ता. ०७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विकास साहेबराव साठे (वय ३८, व्यवसाय पोल्ट्री रा. नायगाव रेल्वे गेट नंबर 07 घुलेवस्ती, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळलेल्या माहिती नुसार, विकास साठे हे नायगाव रेल्वे गेट नंबर 07 घुलेवस्ती, परिसरात कुटुंबासहित राहतात. घरी तीन रूम असल्याने सर्वजण दोन रूममध्ये झोपले होते. यावेळी त्यांची आई राहत असलेल्या बेडरूमला कडी कोयंडा लावून शेजारी असलेल्या रूममध्ये झोपल्या होत्या. दरम्यान, रविवारी (ता. ०६) रात्री १२ ते सोमवारी (ता. ०७) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बेडरूमचे कडी कोयंडा व लॉक तोडून घरातील लाकडी कपाटाचे लॉकरमधील रोख रक्कम व मौल्यवान सोन्याचे दागिने चोरून नेले.
दरम्यान, यामध्ये सोन्याचे लक्ष्मी हार, सोन्याची अंगठी, चांदीचे वाळे, व रोख रक्कम यांचा समावेश आहे. याप्रकरणी विकास साठे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख करीत आहेत.