संत सोपानकाका सुंदर माझी शाळा स्पर्धेत पुरोगामी विद्यालय हवेली तालुक्यात प्रथम…

हवेली : संत सोपानकाका सह, बॅंक शिवाजी शिक्षण संस्था व संत सोपानकाका फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ यावर्षी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या संत सोपानकाका सुंदर माझी शाळा अभियानात हवेली तालुक्यातून पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव या विद्यालयाचा प्रथम क्रमांक मिळाला.

या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच सासवड येथे आचार्य अत्रे सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्याचे माजी आयुक्त कांतिलाल उमाप, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप सेकंडरी स्कूल पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संत सोपानकाका सह. बॅंकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, उपक्रमाचे संयोजक, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श प्राचार्य नंदकुमार सागर यांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले.
पुरोगामी शिक्षण संस्थेचे विश्वस्त राघवदास चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, उपक्रमशील शिक्षिका स्वाती वाठारकर, बापूसाहेब गाढवे, विठ्ठल ठोंबरे, हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दिलीप थोपटे व सर्व शिक्षकांनी पारितोषिक स्वीकारले. पुरोगामी विद्यालयात अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम राबविले जातात.

विद्यालयाला भव्य असे प्रांगण आहे. संपुर्ण शाळा डिजिटल आहे. शाळेत नियमित स्वच्छता राखली जाते. विद्यार्थ्याच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा चित्रकला परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. विद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, विज्ञान प्रयोगशाळा आहे.
या सर्व बाबींचे परिक्षण होऊन निवड समितीने संत सोपानकाका सुंदर माझी शाळा स्पर्धेत प्रथम क्रमांक देऊन निवड केली आहे, असे मुख्याध्यापक प्रवीण गायकवाड यांनी सांगितले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरघे सचिव रंगनाथ आप्पा कड उपाध्यक्ष रामदास चौधरी सर्व विश्वस्त यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी संत सोपानकाका सहकारी बँकेच्या संचालिका व ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप, संचालक प्रकाश पवार, धनंजय काकडे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, अरुण थोरात, अमृत पांढरे, प्रसाद गायकवाड, शिवाजीराव किलकिले, राजेश गायकवाड इ तर पाच जिल्ह्यांतील शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार सागर, उपस्थितांचे स्वागत सुधाकर जगदाळे, यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तात्रय रोकडे तर आभार प्रदर्शन वसंतराव ताकवले यांनी केले. नियोजन हनुमंत पवार, कुंडलिक मेमाणे, रामप्रभू पेटकर, रविंद्र पंत जगताप अनिल उरवणे दिलीप साबणे चंद्र शेखर जगताप सतिश शिंदे यांनी केले.