भोंदू अशोक खरातच्या दुसऱ्या गुन्ह्यातही अडचणी वाढल्या; मंतरलेल्या पाण्याचा सस्पेन्स….,कोर्टात नेमकं काय घडलं?


नाशिक: महिलांचे लैगिंक शोषण, लोकांची जादूटोणाच्या नावाखाली फसवणूक केल्या प्रकरणातील आरोपी अशोक खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले होते. एका महिलेवर अत्याचार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी दाखल केलेल्या दुसऱ्या गुन्ह्यातही खरातला न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. या प्रकरणी खरातला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातची आज व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली.एका महिलेवर अत्याचार आणि तिचा गर्भपात केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गु्न्ह्यात खरातला आज कोर्टात हजर करण्यात आले. जवळपास २०-२५ मिनिटे युक्तिवाद करण्यात आला. यावेळी कोर्टाने आरोपी खरातला तुम्हाला काही बोलायचे आहे असा सवाल केला. कोर्टात सरकारी वकिलांनी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी केली ती मागणी न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार त्याला आठ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आजच्या सुनावणीत सरकारी वकिलांनी गंभीर आरोप करत काही मुद्यांच्या तपासासाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. आरोपीची लैंगिक शोषण करण्याची मोडस ऑपरेंडिटी होती, गर्भपात करण्यासाठीचे औषध कुठून आणले, पीडित महिलेच्या आई वडिलांना त्याने धमकावले, आधार कार्ड पॅन कार्ड कशासाठी घेतले ? त्याचे काय केले ? आरोपी हा मास्टर माईंड असून तपासात सहकार्य करत नसल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच आरोपी कोणते औषध वापरत होता, मंतरलेल्या पाण्यामध्ये काय टाकत होता हे तपासायचे आहेत, त्यासाठी तपास करायचा आहे, गंभीर गुन्हा असल्यानं तपास करायचा आहे 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. त्यानुसार आता खरातच्या अडचणी वाढल्या आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!