प्रियंका गांधींची सुप्रीम कोर्टात धाव, कारण…
नवी दिल्ली : उच्च न्यायालयाने आयकर विभागाचा कर मूल्यांकन केंद्रीय मंडळाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या प्रकरणी २६ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी, आम आदमी पार्टीला या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नव्हता.
आता प्रियांका गांधी यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. ५ संस्थांचे आयकर मूल्यांकन केंद्रीय मंडळाकडे हस्तांतरित करण्याचे निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिले होते.
या निर्णयाला त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी प्रियंका गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
दरम्यान, उच्च न्यायालयाने प्राप्तिकर प्राधिकरणाच्या कर हस्तांतरण मूल्यांकन अहवालावर शिक्कामोर्तब केले आहे. आयटी विभागाने संजय गांधी मेमोरियल ट्रस्ट, राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, यंग इंडियन आणि जवाहर भवन ट्रस्ट या पाच संस्थांचे आयटी मूल्यांकन हस्तांतरित केले होते.
आता प्राधिकरण कागदपत्रांची अधिक सखोल चौकशी करेल, जेणेकरून या प्रकरणाच्या तळापर्यंत त्यांना पोहोचता येईल. असेही सांगितले जात आहे.