कैद्यांबाबत मोठा निर्णय! आता कैदी करु शकतील कुटूंबियांना व्हिडिओ कॉल, येरवडा कारागृहातून होणार सुरूवात

पुणे : पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैदी लवकरच त्यांच्या घरच्यांना साधा वा व्हिडीओ कॉलही करू शकतील. कारागृहातील कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिकतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असून लवकरच या उपक्रमाला सुरूवात होणार आहे

राज्यातील सगळ्याच रागृहांमध्ये कैद्यांना भेटण्यासाठी नातेवाईक येत असतात, व त्यांची मोठी गर्दी होत असते. तसेच कैद्यांना त्यांच्या बराखीतून कॉइन बॉक्स पर्यंत न्यावे लागते ते सुरक्षेच्या दृष्टीने जोखमीचे ही ठरू शकते. त्यामुळे मोबाईल फोन द्वारे संभाव्य धोका कळू शकतो, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या उपक्रमाची लवकरच येरवडा कारागृहातून सुरूवात करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येरवडा कारागृहात प्रायोगिक तत्त्वावर याला सुरुवात करण्यात येईल आणि टप्प्याटप्प्याने राज्यातील सर्वच कारागृहात ही सुविधा दिली जाणार असल्याची माहिती आहे.
