प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सचिन मोरे यांची नियुक्ती…!
लोणंद : राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटण येथील ‘धैर्य टाईम्स’चे संपादक सचिन संपतराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली. लोणंद (ता. फलटण) येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (ता. ०८) करण्यात आले होते. यावेळी राज्य अध्यक्ष सुनील जगताप यांनी सचिन मोरे यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करताना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
यावेळी राज्य उपाध्यक्ष व पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर, कार्याध्यक्ष सचिन सूंबे, खंडाळा तालुका अध्यक्ष मोहन बोरकर, आबा धायगुडे, मंगेश माने, विजय शेळके, बोलकीस्ट शेख मॅडम, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, मुकुंदराज काकडे, अमोल काकडे, बापू दोरके, यांच्यासह अन्य राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
दम्यान, सचिन मोरे फलटण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात गेली 19 वर्ष कार्यरत असून ‘धैर्य टाईम्स’ वृत्तपत्र, चॅनेल, व वेबपोर्टलचे ते संपादक आहेत. पत्रकारितेमधील त्यांच्या उल्लेखनीय कार्याच्या पार्श्वभूमीवर सदरची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन मोरे यांच्या नियुक्तीने वृत्तपत्र आणि डिजिटल मीडिया क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
याबाबत बोलताना सचिन मोरे म्हणाले, “”समाजासाठी आणि लोकशाहीसाठी जगणाऱ्या वागणाऱ्या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी संघटना सदैव प्रयत्न करणार आहे. तसेच नव्या पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी पत्रकारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी “प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघ” कायम त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे.