मुख्याध्यापकाकडून 8 वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार अन्…!! धक्कादायक घटना समोर..

मुख्याध्यापक की हैवान, ८ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार अन्…, धक्कादायक घटनेने उडाली खळबळ

नंदुरबार : राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच बलात्कार केला. मुख्यध्यापकाच्या अशा वर्तनामुळे इतर मुलांची सुरक्षा देखील वाऱ्यावर आहे.

मुख्याध्यापकाने मुलीसोबत गैरवर्तन केल्यांमुळे शाळेत देखील मुली सुरक्षित आहेत की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्याध्यापकाने फक्त विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले नाही तर, तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेमुळे आश्रममध्ये खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर धडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय आश्रम शाळा तलाईच्या मुख्याध्यापक सह वस्तीगृहाच्या व्यवस्थापिकेवर देखली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नराधम मुख्याध्यापक रायसिंग वसावे आणि व्यवस्थापिका मालती पाडवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी आता अधिक चौकशी करत आहेत.
घटना उघड झाल्यानंतर आदिवासी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण दिसत आहे. घटलेल्या घटनेनंतर आदिवासी आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. घटनासमोर आल्यानंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी मुलीचं कुटुंबिय आणि गावकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणी काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
