लाल किल्ल्यावर भाषण देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, पुढच्या वेळी…

नवी दिल्ली : देशभरात आज ७६ व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण केलं. पंतप्रधानांची ध्वजारोहण करण्याची ही १० वी वेळ आहे. यावेळी अनेक विषयांनर भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी स्वातंत्र्यदिनी देशवासियांना संबोधित केले. पुढच्या वेळी अधिक आत्मविश्वासाने या लाल किल्ल्यावर येईन, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, २०१४ साली मी परिवर्तनाचे वचन घेऊन आलो होतो.
देशातील १४० कोटी जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म या आश्वासनाचे विश्वासात रुपांतर झाले आहे. या वचनाचे मी विश्वासात रूपांतर केले आहे.
वचनाचे विश्वासात रूपांतर करण्यासाठी कष्ट केले, मेहनत घेतली, असे पंतप्रधान म्हणालेसाठी देशासाठी मेहनत केवळ राष्ट्राच्या सर्वोच्च भावनेने केली आहे. २०१९ मधील कामगिरीच्या आधारावर आपण सर्वांनी मला आणखी एक संधी दिली.