पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३० सष्टेंबरला दौंड तालुक्यात! ग्रामविकासासंदर्भात पाहणी व संबोधन करणार…


उरुळीकांचन : ग्रामविकास विभागाच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा दौंड तालुका दौरा निश्चित झाला आहे. येत्या ३० सष्टेंबर रोजी ते दौंड तालुक्यात येत असून त्यानुसार तयारी सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पाटस( ता. दौंड) येथे निवड करण्यात आलेल्या कार्यक्रमस्थळाची पाहणी नुकतीच पार पडली आहे. या पाहणी दरम्यान आमदार राहुल दादा कुल, विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, पोलिस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे श्री. गजानन पाटील, अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी पोलिस दौंड बापूराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, गोपाळ पवार, प्रांताधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार अरुण शेलार, गटविकास अधिकारी अरुण मळभर तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या पाहणीत सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कार्यक्रमस्थळाची आखणी तसेच नागरिकांच्या सोयी-सुविधांचा सखोल आढावा घेण्यात आला.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!