पंतप्रधान मोदींच्या हस्ते नव्या मुंबई विमानतळाच उद्घाटन ; भूमिपत्राचे भरभरून कौतुक, दि.बा.पाटलांचं नाव घेत म्हणाले…


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमात मोदी यांनी जोरदार भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात दि बा पाटील यांचे नाव घेत कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

आज मला महाराष्ट्राचे सुपुत्र, दिग्गज नेते दि. बा पाटील यांचीही आठवण येते. त्यांनी सेवाभावाने काम केलं. त्यांचं कार्य प्रेरणादायी. आमच्यासाठी ही प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाज सेवा करणाऱ्यांना प्रेरणा देत राहील, असे मोदी म्हणाले. आज देश विकसित भारतासाठी एकजूट झाला आहे. विकसित भारत म्हणजे गतीही असेल आणि प्रगतीही असेल. जर तुम्ही गेल्या ११ वर्षाच्या प्रवासाकडे पाहिलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात या भावनेनेच वेगाने काम होत आहे. जेव्हा वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन धावते, बुलेट ट्रेनचं काम वेगाने होते. मोठे हायवे नव्या शहरांना जोडतात, जेव्हा डोंगर कापून मोठे टनेल तयार होतात तेव्हा भारताची गतीही दिसते आणि भारताची प्रगतीही दिसते. तेव्हा भारताच्या तरुणांच्या उड्डाणाला नवीन पंख लागतात, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. आजचा कार्यक्रमही हा सिलसिला पुढे नेत आहे. नवी मुंबई प्रकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मराठीतून भाषण केले. विजयादशमी झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली. आता दहा दिवसाने दिवाळी. तुम्हाला या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, अशे उद्गार मोदी यांनी मराठीत केले. पुढे बोलताना आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट या क्षेत्राला आशियातील सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी ठरेल, अस त्यांनी म्हटलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!