पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं आज उद्घाटन ;मात्र महायुती सरकारची मोठी खेळी, दि.बा. पाटलांच्या कुटुंबाला दिला VIP पास अन्…


मुंबई : राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांशी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आज लोकार्पण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाच लोकार्पण होणार आहे.विशेष म्हणजे या विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी निवडणुका डोळ्यावर ठेवता महायुती सरकारने यातच मोठी खेळी खेळली असल्याची चर्चा सुरू आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाला काही तास उरले असताना महायुती सरकारने अनोखी खेळी खळल्याची चर्चा आहे. परिणामी आता जिथे जिथे नवी मुंबई विमानतळाचे साईन बोर्ड आहे तिथे आता दि.बा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा कागद चिटकवला जात आहे तर दुसरीकडे दि.बा. पाटील यांची दोन्ही मुलं आणि पत्नी यांना देखील आजच्या सोहळ्याला बोलवण्यात आले आहे. त्यांना व्हीआयपी पास दिल्याची देखील माहिती आहे.

दरम्यान नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी विमानतळाबाहेर उभारण्यात आलेल्या कमानीवर देखील दि.बा. पाटील यांचं नाव बोर्डवर झळकलं असून हा बोर्ड आता साऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे भूमिपूत्राला आज न्याय मिळाला असल्याची भावना नवी मुंबईकरांकडून व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!