‘मुरुम’ चोरीत महसूलचे पंचनामा करण्याचे सोंग! चोरीला कायदेशीर संरक्षण सोडाच, पण चोरांना मात्र अभय…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : पूर्व हवेली तालुक्यातील उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी जल जीवन मिशन योजनेच्या केलेल्या कामातून ‘कोट्यवधीं’चा मुरुम चोरी करुन महसुल विभागाला चुना लावला आहे. या प्रकारानंतर पूर्व हवेली बहुतांशी ग्रामपंचायतीच्या योजनेत खोदकामातून मुरुम चोरीचे तोम माजत असून शासनाच्या तिजोरीला करोडोंचा गंडा बसूनही महसूल विभागाने ई- पंचनामा करण्याचे सोंग घेतले असले तरी जल जीवन मिशन योजनेतील ‘कोट्यवधीं’च्या महसूल बुडीला संरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका महसूल विभाग दाखवित नसल्याने मुरुम चोरांना ‘आव जाव घर तुम्हारा’ अशी मोकळीक मिळाली आहे.

पूर्व हवेलीत उरुळीकांचन ग्रामपंचायतीच्या कारभारी मंडळानी करोडोंचे महसूल उत्पन्न परस्पर विल्हेवाट लावून चोरी करण्याचा प्रकारानंतर नागरीकांच्या तक्रारीनंतर अप्पर महसूल हवेली कार्यालयाने ४.२२ कोटी रुपयांचा दंडाची कारवाई केली आहे.परंतु ही कारवाई जल जीवन प्राधिकरणावर करण्यातआल्याने ‘चोर सोडून संन्याशा’ ला फाशी देऊन शासनाने शासनाच्या एका विभागाला जबाबदार धरले आहे. त्यामुळे पुढील सुणावणीत या दंडाच्या कारवाई चे काय होणार म्हणून कोणत्या ज्योतिषाला सांगण्याची गरज उरली नाही ?अशी कायद्याची तरतूद आहे. मात्र याच त्रुटीचा फायदा घेत उरुळीकांचननंतर पूर्व हवेलीतील बड्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी मुरुम चोरीत सरसावले आहेत. आपले सगळ पाप धुवून निघणार असल्याने चोरीचा उच्छाद वाढला आहे.

मुरुम चोरीच्या या प्रकरणाचे ‘द टाईम टू टाईम’ न्यूज या पोर्टलने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूलने ई- पंचनामा करण्याचे नाटक काढले आहे. परंतु मुरुम उपसा करुन चोरी करण्याला खुले ‘अभय’ सुरू असल्याने कारवाईचे ढोंग कशासाठी ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पूर्व हवेलीत मुरुम चोरीचा गुन्हा पचविल्याची खात्री झाल्यानंतर इतर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी या ‘महान’ कार्यात हात धुवून घेत असून निसंकोचपने मुरुमातून आपले उखळ पांढरे करुन घेत आहे. रॉयल्टीच्या कित्येक पट उत्खनन होऊनही कारवाई सोडा पण मुरुमाचे संरक्षण करण्यासही कायदेशीर प्रक्रिया राबवित नसल्याची वास्तविक परिस्थिती आहे.

महसूलच्या संबंधात अनेक जण या चोरीच्या प्रकरणात गुंतले असून या उत्खनन करुन चोरीच्या प्रकरणात नियमानुसार मुरुमाचा साठा करुन लिलाव पध्दतीने विक्री करुन शासनाच्या तिजोरीत महसूल जमा करण्याचे सोयरसुतक महसूल विभागाला नसून ‘ अर्थिक’ तडजोडीतून शासनाची मोकळी तिजोरी भरुन घेण्यापेक्षा स्वतः ची तिजोरी भरुन घेण्याची जबाबदारी महसूल व जल जीवन मिशनच्या कृतीतून दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!