बिबट्याने हल्ला करून मारल्याचा बनाव! उपसरपंच पुतण्यानेच केला चुलतीचा खून; दौंड तालुक्यातील घटनेमुळे खळबळ..


दौंड : दौंड तालुक्यातील कडेठाण येथे शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे या शेतकरी महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्यात झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र आता या घटनेतील सत्य समोर आले आहे. यवत पोलिसांनी या घटनेतील सत्यता सर्वांसमोर आणली आहे.

शेतकरी लताबाई धावडे यांचा खून सतीलाल वाल्मीक मोरे आणि त्यांचा पुतण्या अनिल पोपट धावडे यांनी केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी सतीलाल वाल्मीक मोरे( रा. सध्या कडेठाण, मूळ चाळीसगाव) व अनिल पोपट धावडे (रा. कडेठाण, ता. दौंड) यांनी लताबाई बबन धावडे यांचा खून करून हा खून अतिशय योजनाबद्ध पद्धतीने पचवण्याचा प्लॅन आखला होता.

लताबाई धावडे यांचा मृत्यू हा बिबट्याच्या हल्ल्यात झाला असे भासविण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र यवत पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने तपास करत यातील आरोपींना जेर बंद केले आहे. अनिल धावडे हा कडेठाण चा उपसरपंच असून त्यांनी साथीदाराच्या मदतीने हा खून करून बिबट्याच्या हल्ल्याचा बनाव असल्याचे आता उघड झाली आहे.

सविस्तर माहिती अशी की, महिला शेतकरी लताबाई बबन धावडे (रा. कडेठाण, ता. दौंड. जिल्हा पुणे) या दिनांक ६ डिसेंबर २०२४ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये मृता अवस्थेत आढळल्या होत्या. बिबट्याच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असावा असे मानले जात होते. मात्र त्या जागी खुरपत होत्या तिथून लांब अंतरावर त्यांचा मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांच्या मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेल्या दगड दिसत असल्याने पोलिसांचा संशय बळावत होता.

मात्र अतिशय गुप्त पद्धतीने पोलिसांनी तपास करून अखेर या खुणाच्या घटनेला वाचा फोडली. या घटनेतील फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मयताचा तपास करीत असताना तपासात मयताचा कोणत्याही वन्यप्राण्याने हल्ला करून मृत्यू झाला नसले बाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर यांचा अहवाल प्राप्त झाला.

त्यामुळे या घटनेचा सखोल तपास सुरू केला असता आरोपींनी आपसात संगणमत करून लताबाई धावडे यांचा खून करण्याचा कट रचून त्यांचे तोंड व डोके दगडाने ठेचून त्यांचा फोन केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.संपांगे हे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!