फडणवीसांवर दबाव वाढला! धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकलपट्टी करा, आता मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका


बीड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात संतोष देशमुख यांची हत्या प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजत आहे. ही हत्या अतिशय निर्घृण पद्धतीने करण्यात आली. यामुळे आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला.

यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सत्ताधारी आमदार विरोधातील आमदार, खासदार उपस्थित होते. या घटनेतील मास्टरमाइंडला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. या हत्या प्रकरणी वाल्मीक कराड यांचे नाव समोर येत असून ते मंत्री धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मानले जातात.

यामुळे वाल्मीक कराड यांना अटक करून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. आता धनंजय मुंडे यांचे मंत्री पदावरून हकलपट्टी करण्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. मृत संतोष देशमुख यांच्या भावाने ही याचिका दाखल केली आहे.

यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत राज्यभर आंदोलने तसेच बंद देखील पाळण्यात येत आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव वाढला असून धनंजय मुंडे यांच्या बाबत ते काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून वाल्मीक कराड हे फरार आहेत. पोलीस त्यांचा तपास करत असून त्यांची बँक खाते गोठवण्यात आली आहेत. तसेच कुटुंबाची आणि त्यांच्या जवळच्या लोकांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

यामुळे ते पोलिसांना शरण येणार की पोलीस त्यांना अटक करणार याची देखील जोरदार चर्चा राज्यात रंगू लागली आहे. याबाबत खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार सुरेश धस हे आक्रमक झाले आहेत. ते याबाबत आक्रमक भूमिका घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!