भारत-पाक सीमेवर युद्धाची तयारी? शेतकऱ्यांना दोन दिवसांत शेत खाली करण्याचे आदेश, सरकार मोठ्या तयारीत, काय घडतंय?


नवी दिल्ली : काश्मीर येथील पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत पाकिस्तान सीमेवर वातावरण तापले आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानचा पुरता बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. असे असताना आता पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. BSF जवानांनी सुरक्षा आणि गस्त वाढवली आहे.

येथील अमृतसर, फिरोजपूर, गुरदासपूर, पठाणकोट हे जिल्हे पाकिस्तानच्या सीमेलगत आहेत. आता याठिकाणी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यामुळे BSF ने येथील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी कुंपणाजवळ लावलेली गव्हाची कापणी दोन दिवसांत पूर्ण करून शेत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

यामुळे मोठं कायतरी घडत असल्याचे बोलले जात आहे. येत्या काही दिवसांत मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वेळेत कापणी न केल्यास गेट पूर्णपणे बंद केले जातील, असे सांगितले गेले आहे. यामुळे शेतकरी देखील कामाला लागले आहेत.

शेतकऱ्यांनी दोन दिवसांच्या आत आपली कापणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या आदेशानंतर शेतकरी कंबाइन मशीनच्या साहाय्याने लवकर कापणी करत आहेत. गावांमध्ये कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास, तात्काळ पोलीस आणि BSF जवानांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच गावकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती लक्षात घेता सगळ्या गोष्टींचा विचार करून काळजी घेतली जात आहे. यामुळे आता दोन्ही देशातील तणाव वाढणार की कमी होणार हे लवकरच समजेल. याबाबत आपल्या देशाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!