भारताचे सर्वात मोठे मिशन असलेले चंद्रयान-3 ची तयारी पूर्ण, ‘या’ दिवशी होणार लॉन्च…


नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन केंद्र अर्थात इस्त्रोकडून एक महत्त्वाची माहिती जारी करण्यात आली आहे. इस्त्रोचे शास्त्रज्ञ गेल्या काही दिवसांपासून चांद्रयान-3 मोहिमेसाठी दिवसरात्र काम करत आहेत. ही मोहिम इस्त्रो आणि भारत सरकारसाठी अतिशय महत्त्वकांक्षी अशी मोहीम आहे.

ही मोहिम यशस्वी झाली तर शास्त्रज्ञांना चंद्र ग्रहावरील अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे. ही मोहीम यशस्वी ठरली तर चंद्राविषयीचे अनेक गूढ उलगडण्यास मदत होणार आहे.

इस्त्रोच्या चांद्रयान-२ चं चंद्रावर लँडिंग झाल्यानंतर अंतिम क्षणाला संपर्क तुटला होता. त्यामुळे खगोल शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशाच्या नागरिकांचा मोठा हिरमोड झाला होता. या नव्या चांद्रयान-3 मोहिमेवर सरकारसह शास्त्रज्ञांना खूप आशा आहे.

दरम्यान, चंद्रयान-3 हे आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन १४ जुलैला लॉन्च होणार आहे, असे इस्त्रोकडून जाहीर करण्यात आले आहे.

त्याच दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रयान-३ चं प्रक्षेपण होणार असल्याची महत्त्वाची माहिती इस्त्रोकडून ट्विटरवर देण्यात आली आहे. चंद्रयान-३ हे मिशन चंद्रयान-2 चं रिपीट मिशन असणार आहे हे इस्त्रोने यापूर्वी स्पष्ट केले आहे.

इस्त्रोकडून नुकतंच याबाबतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. चांद्रयान-3 हे रॉकेटच्या वरच्या भागात ठेवण्यात आलं आहे. यानंतर ते असेम्लिंग युनीटमध्ये नेण्यात आलं आहे. जीएसएलवी एमके-३ या रॉकेटशी ते संलग्न करण्यात आलं आहे, अशी माहिती समोर आली आहे.

इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी या विषयी माहिती दिली आहे. चांद्रयान-३ हे यान 23 आणि 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा परिघात लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल, अशी महिती एस सोमनाथ यांनी दिली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!