गर्भवती महिलेची दोन वर्षाच्या मुलीला पोटाला बांधत विहिरीत उडी, कारण ऐकून सगळेच हादरले…


यवतमाळ : येथील दारव्हा तालुक्यातील ब्रम्ही गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी एका गर्भवती महिलेने दोन वर्षीय मुलीसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पूजा मोहन नेमाने (२५) आणि काव्य मोहन नेमाने (२) रा. ब्रम्ही ता. दारव्हा असे मृत मायलेकींची नावे आहे. पूजा नेमाने ही गर्भवती महिला तिच्या दोन वर्षाच्या मुलीसह पती, सासू, सासऱ्यासह राहात होती.

सकाळी पूजा हीने आपल्या दोन वर्षीय मुलीला पोटाला घट्ट बांधले. त्यानंतर दोघींनी गावालगतच्या मारुती दूधे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेतली. पाण्याच्या खोलीत बुडाल्याने दोघींचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी लाडखेड पोलिस ठाण्यात पती मोहन रोडबा नेमाने (३०), सासू रंजना रोडवा नेमाने (५०) आणि रोडबा नेमाने या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे. घरगुती त्रासामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला.

त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. याबाबत मृतक पुजा हीचे वडील गुलाब ज्योतीराम शिंदे (४८) रा. बोरजाई ता. कळंब यांनी तक्रार दाखल केली आहे. लाडखेड पोलिसांनी पती मोहन याच्यासह सासू सासऱ्यावर विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार विनायक लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहे. घटनेची माहिती मिळताच लाडखेड ठाणेदार विनायक लंबे, पोलिस उपनिरीक्षक रामकिसन जायभाय यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने गावकरी हळहळले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!