अखेर ठरलं! प्रविण माने अजित पवार यांच्यासोबत राहणार! सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात होणार सहभागी..!!
Pravin Mane : पुण्यामध्ये आज पत्रकार परिषद घेऊन प्रवीण माने यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये माने कुटुंबिय आता सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे प्रविण माने यांनी
स्पष्ट केले आहे.
प्रविण माणे म्हणाले , आता अजित पवार यांचे हात बळकट करून त्यांची ताकद वाढवण्यासाठी आणि इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही अजित पवारांसोबत राहणार असल्याचे प्रवीण माने म्हणाले आहेत.
राज्याचा विकास व्हावा यासाठी अजित पवार हे भाजपसोबत गेले आहेत. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत.
आज पासूनच आम्ही प्रचार सुरू करणार आहोत. सुनेत्रा वहिनी यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. असे देखील वक्तव्य प्रवीण माने यांनी केले आहे.