इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग!! अपक्ष विधानसभा लढवून हर्षवर्धन पाटील यांच्या पराभवाचे कारण ठरलेले प्रवीण माने भाजपमध्ये जाणार…

इंदापूर : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत इंदापूरची निवडणूक प्रचंड गाजली होती. याचं कारण म्हणजे ऐनवेळी इथं पार पडलेली तिरंगी निवडणूक.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांचा विजय पक्का मानला जात होता. अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे सहज हरतील, असा अंदाज वर्तवला जात होता.
तसेच विधानसभा निवडणुकीत इंदापूरची निवडणूक प्रचंड गाजली होती. याचं कारण म्हणजे ऐनवेळी इथं पार पडलेली तिरंगी निवडणूक. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला होता.
हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर त्यांचा विजय पक्का मानला जात होता. अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे सहज हरतील, असा अंदाज वर्तवला जात होता. इंदापूरच्या निवडणुकीत जायंट किलर ठरलेले प्रवीण माने आता भाजपच्या वाटेवर आहेत. २ जुलै रोजी त्यांचा भाजपात अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर भाजपला इंदापुरात तगडा चेहरा हवा होता. आता प्रवीण माने यांच्या रूपाने भाजपची ही इच्छा पूर्ण होणार आहे. प्रवीण माने हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात. यातूच त्यांचा भाजपात प्रवेश होत असल्याचं सांगितलं जात आहे.