सोलापूरवरून काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये जुंपली, प्रणिती शिंदे म्हणाल्या, कोण रोहित पवार ?


सोलापूर : काही दिवसांपूर्वी आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असे म्हटले होते. यावरून काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत.

आमदार प्रणिती शिंदे यांनी रोहित पवार यांना जोरदार उत्तर दिले आहे. प्रणिती शिंदे यांनी कोण रोहित पवार? असा सवाल करत पोरकटपणा असतो काही लोकांमध्ये. आमदार म्हणून त्यांची पहिलीच टर्म आहे. त्यांना थोडे दिवस दिले की मॅच्युरिटी येईल, असे म्हटले आहे.

यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ कोणी लढवयचा, याबाबत महाविकास आघाडीची बैठक होईल, असा माझा अंदाज आहे. यामध्ये ही जागा काँग्रेसकडेच राहिल की राष्ट्रवादीकडे हे या बैठकीत ठरेल. असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते.

यावर काँग्रेस आता आक्रमक झाला आहे. दरम्यान, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आम्ही सोलापूर सोडला, तर आम्हाला बारामती मतदारसंघ सोडणार का, असा सवाल केला होता. नंतर राष्ट्रवादीकडून महेश कोठे यांनी बारामतीकरांना आव्हान देणं म्हणजे सुशीलकुमार शिंदे यांना अडचणीत आणण्यासारखे आहे, असे उत्तर दिले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!